अमळनेरात पत्रकार दिनानिमित्ताने ६ रोजी रंगणार हास्स्य कविसंमेलन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिरात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्ताने हास्स्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी – ०६.३० ते १०.०० रात्री वाजेपर्यंत हे हास्स्य कविसंमेलन रंगणार आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. या हास्स्य कविसंमेलनात हिंदी आणि गजलवर प्रभूत्व आणि टि.व्ही कलाकार असलेल्या प्रसिद्ध जीनत एहसान कुरैशी, दुबई, कोयला येथे हास्य कवितांचा कार्यक्रम गाजवणारे मुजावर मालेगावी, उर्दू आणि हिंदी हास्य कविसंमेलनात कविता सादर करणारे सुंदर मालेगावी, हिंदी, उर्दूवर प्रभुत्व असलेले इब्राहीम सागर,नेपाळ आणि महराष्ट्र व गुजरातमधील ऑलइंडिया कविसंमेलनात सहभागी कलिम गडबड या प्रसिद्ध हास्स्य कविंचा सहभाग असणार आहे. यात मराठी, अहिराणी, हिंदी, उर्दू भाषेतून
व्यंग, विडंबमनातून उडणाार हस्स्याचे कारंजे उडणार आहेत.

अमळनेरच्या भूमिपुत्राची विशेष उपस्थिती

या हास्स्य कविसंमेलनाचे विशेष महत्व म्हणजे यात अमळनेरचा भूमिपूत्र, टिव्ही मालिका,चित्रपट, अभिनेता कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले विलासकुमार शिरसाठ यांचा विशेष सहभाग राहणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *