अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…!

जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी भविष्यात तिव्र आंदोलन छेडणार-अमोल माळी.अमळनेर(प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशाने अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने ताडेपुरा येथील कृष्णा पेट्रोलियम वर पेट्रोल डिझेल दरवाढीचा विविध घोषणा देऊन निषेध करण्यात आला.व जी एस टी अंतर्गत समावेश करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या साडेचार वर्षापासून केंद्रात व राज्यात भा.ज.पा सरकार आहे. निवडणुकी पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तताा करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.शेतकरी,कष्टकरी,महिला,कर्मचारी,युवक ह्या सर्वांना ज्ञाय मिळवून देण्यासाठी भविष्यात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.यावेळी अमळनेर विधानसभा अध्यक्ष अमोल माळी,राहुल पाटील, महेश पाटील,निलेश वानखेडे,उमेश बोरसे,मोहसिन पठान, जितेंद्र वाणी,किरण पाटील,शाकीर पठाण,मनोज बिऱ्हाडे,विकास चौधरी, दुष्यंत करसकर,केदार देशमुख यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *