विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये साने गुरूजींच्या कार्याला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे शनिवारी “पूज्य साने गुरुजी” यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते ‘पूज्य साने गुरुजी’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी ‘श्यामची आई ‘या पुस्तकातील साने गुरुजींचे बालपणातील प्रसंगाचे वर्णन विद्यार्थ्यांसमोर केले. तसेच सोनाली पाटील यांनीही अगदी मार्मिक शब्दात साने गुरुजी विषयीची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत कुमार देवरे यांनी विद्यार्थ्यांना श्यामचे म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांचे विचार, जिद्द ,चिकाटी आपल्या शैक्षणिक व व्यावहारिक जीवनात कशाप्रकारे उतरवता येईल याविषयीचे मार्गदर्शन केले .तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर यांनीही साने गुरुजींच्या कार्याविषयीची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री देसले यांनी केले. कार्यक्रमात इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *