राष्ट्र संताच्या प्रतिमेवर दगडफेकल्याने अमळनेरात केले रास्तारोको आंदोलन

दोषींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आंदोलन घेतले मागे

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्र संताच्या प्रतिमेवर दगडफेक करून प्रतिमा खराब करून सामाजिक भावना दुखावल्याने शिवसेना व नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्र संताच्या प्रतिमेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रतिमा खराब केल्याने एका समाजामध्ये नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला. काही नागरिक रस्त्यावर उतरले आणि रस्ता रोको आंदोलन सुरू केले. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, शहर प्रमुख सुरज परदेशी, अनंत निकम, उमेश वाल्हे, रवींद्र जाधव, अविनाश जाधव, विनोद जाधव, अमृत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून वाहतूक थांबवली. घटनास्थळी पोलीस नाईक रवी पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे, मिलिंद भामरे यांनी भेट देऊन आंदोलन कर्त्यांची समजूत घातली. रवींद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *