धुळ्याच्या एसपींनी १ तास ४ मिनिटातच सायकल वारीतून थेट गाठले अमळनेर

आरोग्य, पर्यावरणाचा संदेश पेरत नाशिकहून शेगाव निघालेल्या सायकलपटूंना दिले पाठबळ

अमळनेर भूमित पीआय विजय शिंदे यांनी उत्स्फूर्त स्वागत करीत दिली स्नेहाची उर्जा

अमळनेर (खबरीलाल विशेष) सृदृढ आरोग्य, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन आणि बेटी बचाव असा सामाजिक संदेशाची पेरणी करीत नाशिकहून शेगावला निघालेल्या सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी थेट या सायकल वारीत सहभाग घेतला. त्यांनी सकाळच्या गुलाबी थंडीत आपल्या सायकलीने अवघ्या १ तास ५ मिनिटात अमळनेर गाठून या सायकलपटूंना पाठबळ दिले. तर या सर्वांचे अमळनेरच्या भूमित आगमन होताच पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करीत सर्वांमध्ये स्नेहाची उर्जा भरत प्रोत्साहन दिले. या वेळी पोलिस अधिक्षक बारकुंड यांनी केलेल्या मार्गदर्शनाने सर्वच प्ररित झाले. हा घडून आलेला अनोखा सोहळा अमळनेरकरांनी डोळ्यात साठवून ठेवला..
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या नाशिक ते शेगाव या सायकल वारीचा प्रारंभ नाशिक येथून २३ डिसेंबर रोजी झाला. यात सहभागी सायकलिस्टांना प्रोत्साहित करण्यासाठी अध्यक्ष किशोर माने, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, सचिन नरोटे, तसेच वारी प्रमुख बाबू दादा जाजनुरे व नरेश देविदास काळे यांनी वारीस शुभेच्छा देऊन प्रस्तान केले. नाशिकहून सकाळी ६ वाजता निघलेली ही सायकल वारी पिंपळगाव बसवंत, चांदवड, आर्वी, सौंदाणे, चाळीसगाव फाटा, मालेगाव आर्वी, धुळे येथे पोहचली. शु्क्रवारी रात्री धुळे येथे सायंकाळी ६ वाजता हॉटेल मानस येथे सर्व सायकलिस्ट पोहचल्यानंतर चहा पाणी घेतले. नंतर रात्री ७ ते ९ वाजेदरम्यान स्नेहभोजन घेतल्यावर धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सानेगुरूजी स्मारकाचे दर्शन घेऊन भारावले

अमळनेर येथे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वागत केले. त्यानंतर खमंगदार असा नाश्ता दिला. या वेळी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड आणि अमळनेरचे पोलिस अधीक्षक विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सायकलिस्ट ज्या उद्देशाने निघाले आहेत. तो खरोखर कौतुकास पात्र असल्याचे सांगून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर सानेगुरूजी यांच्या स्मारकाचे दर्शन घेत खरा तो एकची धर्म जगला प्रेम अर्पावे, असा संदेश आत्मसात करीत वारी पुढे निघाली. स्वागतावेळी दीपक माळी, सिद्धांत सिसोदे, रवी पाटील, लक्ष्मीकांत शिंपी, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

धुळे एसपींचा उत्साह सर्वांनाच लाजवणारा

सायकल वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत धुळ्याहून थेट अमळनेरपर्यंत सायकलीने प्रवास करीत वारीतील सदस्यांना प्रोत्साहीत केले. अवघ्या १ तास ४ मिनिटात ते ४० किलोमीटर अंतर सायकलीने आले. त्यांचा हा उत्साह सर्वांनाच लाजवणार असा आहे.

सव्वा लाखाच्या सायकलची सवारी

सायकल वारीत सहभागी झालेल्यांकडे ३० ते ७० हजारापर्यंतच्या सायकली आहेत. तर धुळे जिल्हा पोलिसी अधीक्षक बारकुंड यांच्याकडे सव्वालाखाची सायकल आहे. ती कार्बन मटेरीय असलेली आहे. तिचे वजन ३.५ किलो आहे. परंतु सायकल कितीही महागडी असली तरी पायडलींग करावीच लागते. धुळे पोलिस अधीक्षक बारकुंड हे नाशिकला क्राईम बँचला होते. तसेच पोलिस निरीक्षक विजय शिंदे हे आधीपासूनच या ग्रुपशी जुळले असल्याने पुन्हा या वारीनित्ताने सुर जुळून आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे आणि उत्साहाचे भाव दिसून आले.

एका महिलेसह ३८ सायकल वारकरी

या सायकल वारीत ३८ जण सहभागी झाले आहे. यात ५६ वय असलेली १ गृहिणी महिला आहे. त्यांचा उत्साह अनेकांना लाजवणार असाच आहे. विशेष म्हणजे या वारीत अभियंता, एलआयसी. डॉक्टर आहे. झाडे लाव झाडे जगवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, बेटी बचाव आदी जनजागृती करीत वारी निघाली आहे. विशेष म्हणजे यात सहा सुपर क्लासवन अधिकारी, ५ क्लास २ अधिकारी आहेत. झाडे लावली पाहिजे, झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, बेटी बचाव असा ते संदेश देत आहेत.

हरीश बैजल यांच्या प्रेरणेने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची निर्मिती

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनमध्ये चार हजारावर सदस्य आहेत. सोलापूरचे माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दहा वर्षापूर्वी आठ सभासद होते. केवळ पोलिसच नव्हे तर सर्व क्षेत्रातील नागरिक आणि महिला सभासद आहेत. जलसंपदाचे इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शेतकरी, एमएसईबी, एलआयसी, इंडस्ट्रीयल इंजिनिअर आदी क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यात विशेष म्हणजे साधारणतः ३० टक्के या महिला सभासद आहे. दरवर्षी नित्यनिमयाने नाशिक ते पंढरपूर ही पर्यावरण रॅली काढत असतो. त्याला आठ वर्ष झाले. तर नाशिक ते शेगाव रॅलीला पाचवे वर्ष आहे. नाशिक ते कोटनगाव ही रॅली करतो. तिचे ७ वर्ष होतं. मिशन फॉर हेल्थ जनजागृती करीत आहोत, असे सायकलिस्ट सदस्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *