अमळनेर(प्रतिनिधी) येथील खा.शि.मंडळाच्या जि.एस.हस्यस्कूलची कोकणातील समुद्रकिनारे, तेथील सौंदर्य यासह प्रेक्षणीय स्थळांवर सहल उत्साहात झाली.
शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांच्या मार्गदर्शन तथा परवानगीने जि.एस.हायस्कूल ची पाच दिवसांची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. शैक्षणिक सहलीला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात ७७ विद्यार्थी व ८ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळी ऐतिहासिक,भौगोलिक माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांनी संपूर्ण सहलीत धमाल केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,सहल विभाग प्रमुख आर. जे. पाटील, आर. एन. साळुंखे, उपशिक्षक के. आर. बाविस्कर, ए. ए. पाटील, राहुल बहिरम, सी.आर.पाटील तसेच एन.जे.पाटील उपस्थित होते.सहल सुखरूप आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
या स्थळांना दिल्या भेटी
या पाच दिवसीय सहलीत रायगड, रत्नागिरी, तळकोकणातील सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. यात इमॅजिका वॉटर पार्क, अष्टविनायकापैकी एक पालीचा गणपती, महाड येथील चवदार तळे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक, चिपळूण, परशुराम मंदिर, पावस येथील मठ, डेरवणची शिवसृष्टी, संगमेश्वर, मार्लेश्वर, गणपतीपुळे, कनकेश्वर महादेव, मालवण, तारकल्ली येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा, सावंतवाडी, अंबाबाई तसेच महालक्ष्मी मंदिर, शाहू पॅलेस, ज्योतिबा मंदिर आणि शेवटी शिर्डी असा प्रवास करत सहल अमळनेरात पोहचली.