दहिवद येथे झालेल्या शिबिरात ४०० जणांची आरोग्य तपासणी

अनुसया कपूरचंद बहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथे स्व.अनुसया कपूरचंद बहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर झाले. यात ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. बचत गट हॉल येथे शिबिर झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक प्रवीण काशिनाथ माळी मा.उपसरपंच तसेच प्रमुख मान्यवर जयवंतराव गुलाबराव पाटील चेरअमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, देवानंद कपूरचंद बहारे सरपंच ग्रा.प.दहिवद, ईश्वर गिरधर माळी चेअरमन दहिवद वि.का. सोसायटी, गोकुळ माळी सामाजिक कार्यकर्ते माणिकराव पाटील ग्रा.प.सदस्य, हिराबाई भिल,वर्षा पाटील, मालुबाई माळी, सुनील पाटील, शिवाजी पारधी, योगिता गोसावी, वैशाली माळी उपस्थित होते. आरोग्य शिबीरचे उद्घाटन प्रवीण काशिनाथ माळी मा. उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम सुरवात झाली. या वेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गावातील व पंचक्रोशीतील व्यक्तींची आरोग्य तपासणी गोदावरी फौंडेशन जळगावचे डॉक्टर अब्दुल्ला, डॉ. चेतन्य, डॉ. शिफा याच्या सोबत गोदावरी फौंडेशनच्या संपूर्ण टीमने तपासणी केली. सूत्रसंचालन जिजाबराव माळी यांनी केले. आभार शिवाजी पारधी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *