अमळनेर (प्रतिनिधी) सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे ११२ व्या स्थापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १२५ ग्राहकांनी आपले आरोग्य तपासणी केली. शहरातील नामांकित डॉक्टर पुरुषोत्तम सूर्यवंशी आणि डॉक्टर पंकज चौधरी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. बँकेचे शाखा व्यवस्थापक रमण गावडे यांनी दोन्ही डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. या ठिकाणी सूर्यवंशी डॉक्टर म्हणाले की मीही तुमच्या बँकेचा ग्राहक आहे. बँकेकडून ग्राहकास उत्कृष्ट अशी मदत केली जाते आणि यासारखे कॅम्प लावण्याची बँकेची खूप चांगली सवय आहे, कार्यक्रमाचे संचालक अधिकारी सुनील सोनिया यांनी कॅम्पचे आयोजन करण्यासाठी बँकेचे सर्व स्टाफ दत्ता चव्हाण, दिलीप सोनवणे, दया कृष्णा संवाद, अशोक शर्मा, किशोर धनगर, सुनील पाटील, ज्ञानेश्वर निकम यांनी सर्वांनी योगदान दिले.