अमळनेर (प्रतिनिधी) कोंढावळ गावातील बहिणाबाई शेतकरी गटाने जिल्हा परिषद शाळा चोपडाई कोंढावळच्या विध्यार्थ्यांना वह्या वाटप करून मदतीचा हात दिला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये कोंडावळ गावातील बहिणाबाई शेतकरी गटाने सहभाग घेतला व गटशेतीच्या माध्यमातून शेतीमध्ये तज्ञ शास्त्रज्ञांच्या व पाणी फाउंडेशनच्या ज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आधुनिक पद्धतींच्या एसओपी करून मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पादकतेत वाढ केली. तसेच एकत्रित निविष्ठा खरेदीमुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत केली व तोट्याची शेती फायद्यात आणली. एवढ्या वरतीच न थांबता गटाने पिकवलेला कापूस देखील विषमुक्त निर्माण केला. तसेच संपूर्ण भारत देशामध्ये मजुरीचा भेडसावणारा प्रश्न तो देखील आडजी पडजीच्या माध्यमातून सोडवला व एक आदर्श पद्धतीने गट शेती केली. ते सार काही घडलं पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपमुळे. त्यामुळे लाखो रुपयाची बचत झाली व लाखो रूपायांची उत्पन्नात वाढ झाली या वाढलेल्या उत्पन्नामधील काही भाग आपण या समाजाचे काहितरी देणे लागतो या उद्देशाने गटातील शेतकरी यांनी सर्वांच्या मते एक बैठक घेतली व गटाला झालेला फायदा यामधील काही रक्कम आपण जिल्हा परिषद येथील शाळेतील विद्यार्थी यांना सर्वांनूमते पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना वही वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. व त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी बहिणाबाई शेतकरी गटातील शेतकरी यांनी शाळेतिल मनोहर भास्कर पाटील, जोती मधूकर पाटील, निंबाजी चंतूर पाटील, विलास आनंदा चौधरी या शिक्षकांशी चर्चा करून विद्यार्थी व पालक मेळावा घेऊन पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.