शेतकरी बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही..अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश गजभिये,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील,माजी आम दार राजीव देशमुख,कल्पना पाटील कल्पिता पाटील,प्रास्तविक योजना पाटील यांनी केले.मनोगत एड रवींद्र पाटील,अनिल दादा पाटील,तिलोत्तमा पाटील, कल्पिता पाटील आदींनी व्यक्त केले सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे,विनोद कदम यांनी केले.
सुप्रिया सुळे बोलतांना म्हटले की मुख्यमंत्र्यांनी याव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मध्ये भारनियमन सुरू व्हाव हे मला समजले. त्याच्यात कुठल्या वेळात आहे ते मला माहिती नाही मला आश्चर्य वाटले मंत्री जळगाव मध्ये येतात काय बहिणाबाई च्या नावाचा विद्यापीठाला नाव देतात काय एवढी चांगली बातमी येते संध्याकाळी मला एका गोष्टीचं वाईट वाटते असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
अमळनेरला राजकारण आणि समाजकारण यात काम करत आहे प्रचंड प्रेम साथ मिळत आहे. आता एवढंच सांगायची इच्छा झाली की अजित दादा मध्ये काम करण्याची जिद्द आहे. त्याच्या काळात पाडळसरे धरणाचे काम पूर्ण झाले सत्ता गेल्यामुळे काम बंद झाले. प्लीज तुम्ही काम पूर्ण करून सत्ता द्या तुम्हाला शब्द देते तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली तरी हे धरण पूर्ण करू आणि पूर्ण झाल्यानंतर जलपूजन फक्त अजितदादा आणि अनिलदादा करतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या महिला शिक्षणानंतर शाहू महाराजांनी पहिला महिलांच्या राज्यात आणि देशात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय घेतला.तेव्हा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एक पुरुष होता आणि त्यांचे नाव शरद पवार यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. आमच्या महिला राजकारण त्यातही करू शकतात आणि तेही घर चालवू शकतात हे माझ्या असंख्य महिला भगिनींनी नेतृत्व करून दाखवले आहे.
सार्थ अभिमान असणाऱ्या महिलांना घराच्या बाहेर पडत नसला तरी घरात सासू-सासरे करता आई-वडिलांचे करता करता तुमच्या महिलांसाठी आपण एक जोरदार गावाजवळ चांगलं काम तुम्ही महिला करता आणि पाचशे रुपये सिलेंडर एक हजार रुपयाला झाले मी एक हजार रुपये का सांगते ५०० रुपये सिलेंडर घरी येत नाही तर आपल्याला जायला लागतं किती खर्च उचलायचा पेट्रोल ९० रुपये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता तर त्या सगळ्या भाजपच्या जाहिराती मला आठवतात.
दारूबंदीबाबत महिलांनी याठिकाणी प्रश्न उपस्थित केले. त्यावर आपण जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी पक्ष, आणि पदाधिकार्यांना याबाबत आवाज उठवायला सांगणार आहे.
जळगाव जिल्ह्यात लोकांशी संवाद साधत आहे. समाजातील विविध घटकांसोबत भेटीगाठी घेत आहे.सर्वच ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मला स्पष्टपणे दिसते आहे. बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. हि स्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत जाईल अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, माझ्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही. याऊलट सत्कारावर होणारा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरावी.
खरेतर या स्थितीची सरकारी यंत्रणेने आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःहून दखल घेऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. किंबहुना ते त्यांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी पक्षाचे नेते राज्यात दुष्काळच नाही असे चित्र उभा करीत आहेत.हे कसलीही घोषणा अथवा पुर्वसूचना न देता भारनियमन, विजकपात सुरु आहे. शेतीला आणि पिण्याला पाणी देतानाही हात आखडता घेतला जात आहे. हे सर्व होत असताना लोकांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर करायला विलंब का होतोय? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, येथील संवेदनशीलता जपत आपण या भागांमध्ये तातडीने विनाविलंब दुष्काळ जाहिर करुन जनतेला दिलासा द्यावा.