अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील ग्रामपंचायतीचे घराला नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पातोंडा सजाचा परिक्षण भूमापकास जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
पिळोदा येथील अविनाश पवार यांच्या आजोबांचे ग्रामपंचायतीत घर विकत घेतले होते १३ सप्टेंबर रोजी त्यांचे आजोबा मयत झाले होते. त्यांनी मृत्युपत्राद्वारे लिहिल्याने ते घर ग्रामपंचायतीत अविनाश पवार यांच्या वडिलांच्या नावाने झाले होते मात्र मिळकतीला नगर भूमापन योजना लागू झाल्याने सीटीसर्वेच्या नकाशा प्रमाणे वाहिवाटीवर अविनाश पवार यांच्या वडिलांचे नाव लागण्यासाठी तक्रादरच्या वडिलांनी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता त्यानंतर तक्रारदार यांच्या वडिलांना मिळकतीचा उतारा व सी.सी.नंबर पूर्तता करण्यासाठी पत्र प्राप्त झाले होते त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पूर्तता केली त्यावेळी भूमिअभिलेख कार्यायालतील लाचखोर परिक्षण भूमापक महेंद्र दत्तात्रय म्हस्के याने नाव दाखल करण्यासाठी ५ हजार रुपये लाच मागितली असता अविनाश पवार यांनी २० ऑगस्ट रोजी जळगांव लाच लुचपत प्रतिबंधक अधीक्षक जि. एम.ठाकूर यांच्याकडे तक्रार केली होती १० रोजी निरीक्षक नीता कायटे व इतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ हजार रुपये लाच स्वीकारतांना लाचखोर म्हस्के यांना रंगेहात पकडण्यात आले त्यास अटक करून अमळनेर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदारांना पुढे येण्यासाठी पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात जनजागृती केली जात आहे. शिवाय गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत चार लाचखोरांवर एसीबीने कारवाई केल्याने भ्रष्टाचार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच मागत असल्यास तक्रारदारांनी न घाबरता तक्रार द्यावी तसेच तक्रार देण्यासाठी जळगाव कार्यालयात येण्याची गरज नाही, शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू, असे सांगत जी.एम.ठाकूर यांनी तक्रारदारांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9607556556 वर संपर्क साधावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.