खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरासह पुण्यातून आलेल्या अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले

दोन्ही वेगवेगळ्या घटनांप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) मावशीकडे बारावाची फॉर्म भरण्यासाठी आलेली पुण्यातील तसेच शाळेत गेलेली शहरातील आणखी एक अशा दोन दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणाहून पळवून नेण्यात आले. यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी शहरातील पारोळा रस्त्यावरील साई गजानन नगरमध्ये आपल्या मावशीकडे १२ वीचा फॉर्म भरण्यासाठी आली होती. १० रोजी संध्याकाळी ५ वाजता मुलीने आपल्या मावशीला कपडे शिवून येते असे सांगून घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून अली नाही. मुलीच्या पुणे येथील चाळी मागे हल्ली राहणाऱ्या जळगाव जामोद सूनसगाव येथील मूळ रहिवासी असिफ तडवी हा तिला भेटायला दोन तीन वेळा आला असल्याने त्यानेच आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुलीने घरातून ९० हजार रुपये अन् सोन्याचे दागिणेही नेले

तर बहादरपूर नाका येथील मजुरी करणाऱ्या महिलेची साडे सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी इंदिरा गांधी शाळेत १२ वीला शिकत होती. १६ रोजी सकाळी मैत्रीणीबरोबर शाळेत गेली व शाळेत गेल्यावर मैत्रिणीला तू वर्गात जा मला वही घ्यायला जायचे आहे म्हणून तेथून निघून गेली. ती परत आली नाही म्हणून तिच्या आईने शोध घेतला व घरातील वस्तू तपासल्या असता तिने घरातील ९० हजार रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने सोबत नेल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी गल्लीतील सुरेश सोमा कोळी हा तरुण देखील बेपत्ता झाल्याचे समजले. त्यामुळे सुरेशनेच तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय येऊन अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने सुरेश विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button