खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे यश

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) अमळनेर येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे स्पर्धा झाली. यात १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मैदानी स्पर्धेत ४ × १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून दिनांक १७ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल मैदानी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

विजयी झालेले खेळाडू असे

कु. शुभम विनोद कुमार, कु. यश भरत सुतार, कु. जयेश अरुण शिवदे कु. पार्थ मधुकर पाटील या सर्व खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व ममता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन नीरज अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे यांनी विजय विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button