ग्रामिण भागातील समाज सक्षम होण्यासाठी महाअधिवेशन-कैलास वाणीअमळनेर-दि २४ व २५ नोव्हेंम्बर रोजी अखिल भारतीय लाड शाखीय समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन पुणे येथे तब्बल २८ वर्षानंतर होणार असून यापार्श्वभूमीवर अमळनेर येथे वाणी समाज मंगल कार्यालयात वाणी समाजाचा हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी महा अधिवेशनास अमळनेरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थिती देतील अशी ग्वाही स्थानिक पदाधिकार्यांनी महाअधिवेधनाचे अध्यक्ष तथा देऊळबंद चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी यांना दिली.
कैलास वाणी यांनी पुणे मुंबई कडे असलेला आपला समाज तेथे प्रगती पथावर असला तरी खान्देशात खेडोपाडी असलेल्या समाजास सक्षम करण्यासाठीच हे अधिवेधन असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.तसेच समाज बांधवांशी अधिवेसनासंदर्भात मन मोकळा संवाद , महाअधिवेशनाचे स्वरूप व त्याची इतंभुत माहीती व मार्गदर्शन त्यानी केले, यावेळी अधिवेधनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र वाणी, मुंबई,सचिव,.राजेश कोठावदे,जळगांव जिल्हा समनवयक गजानन मालपुरे,सहसचिव शशिकांतजी येवले,खजिनदार शामकांत शेंडे,सहखजिनदार.,अजय मालपुरे, कळवण,राज्य समन्वयक.राजेंद्र पाचपुते,.गोविंद शिरोळे,.धिरजजी येवले तसेच अमळनेर नियोजन समिती प्रमुख सुनिल भामरे,तसेच ला. वा पंचमंडळाचे स्थानिक पदाधिकारी श्री योगेश दत्तात्रेय येवले ,श्री सुनिल पांडुरंग वाणी,श्री प्रकाश लक्ष्मण मेखा,श्री नितिन मुरलीधर भदाने,श्री शामकांत वसंत पुरकर ,श्री विजय मुरलीधर कोठावदे , श्री संजय लक्ष्मण अलई,श्री जितेंद्र हरी राणे ,श्री अनिल शंकर वाणी ,सौ सरीता सुधाकर कोठावदे श्रीमती पुष्पा चंद्रकांत भामरे, खा शि मंडळ संचालक हरी भिका वाणी,अरुण नेरकर, प्रभाकर कोठावदे,सुधाकर वाणी,वसंत नेरकर,सौ रंजना देशमुख, महेश शिरोडे ,प्रकाश कोतकर,डॉ शाम नेरकर,डॉ अनिल वाणी, अजय केले,महेश कोठावदे,प्रकाश अमृतकर,राजेश कोठावदे, योगेश येवले,गजानन धांडे,राजेंद्र वाणी, यासह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ उज्वला शिरोडे व कु रोशनी डेरे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी ला वा पंच मंडळ ,युवा सोशल गृप,सुयोग महीला मंडळ,तेजस्वीनी सखी मंच व अमळनेर नियोजन समिती ने परिश्रम घेतले.