प्रतापमध्ये जागर युवा संवाद अंतर्गत साधणार विद्यार्थ्यांशी परिसंवाद,व्यापारी डॉक्टरांसोबतही साधणार मुक्त संवाद
नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन..अमळनेर– (प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा’ या स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड, हुंडाविरोधी अभियानांतर्गत राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत “जागर युवा संवाद” कार्यक्रमाचे आयोजन प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे बुधवार दि 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वा.करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी अमळनेर येथे सुरु असून.राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते अनिल भाईदास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
या कार्यक्रमात खा. सुप्रियाताई सुळे विद्यार्थी- विद्यार्थींनीशी परिसंवाद साधणार आहेत, हा उपक्रम मागील वर्षांपासून सुरु असून यात राज्यातील लाखो युवक व युवती सहभागी झाल्या आहेत.स्त्रीभ्रूण हत्या,युवतींची छेडछेडी,अत्याचार,हुंडाबळी,युवक युवतींची आत्महत्या या घटनांमध्ये वाढ झाल्याने या विरोधात युवक युवतींच्या मनातील भावना जाणून घेण्याकरिता व या घटनांच्या विरोधातील जागर युवक युवतींच्या मनात जागविण्याकरिता हा युवा जागर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रताप महाविद्यालयाची देखील निवड करण्यात आली आहे.
व्यापारी व प्रतिष्ठीत नागरिकांसोबत साधणार मुक्तसंवाद
प्रताप महाविद्यालयातील परिसंवादानंतर सकाळी 10 ते 11 वाजे दरम्यान खा सुळे या शहरातील व्यापारी लायब्ररी येथे शहर व तालुक्यातील डाॅक्टर्स, वकील, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकां सोबत मुक्त संवाद साधुन समाजातील प्रश्न जाणून घेणार आहेत. या उपक्रमासाठी संबधित मान्यवरांना स्वतःअनिल भाईदास पाटील व राष्ट्रवादी चे पदाधिकारी शहर व बाजार पेठेत फिरून आमंत्रण पत्रिका देत आहेत.या उपक्रमास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील,तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,विनोद कदम आदींनी केले आहे.
नाट्यगृहात होणार भव्य महिला मेळावा
खा.सुप्रियाताई सुळे यांच्याच प्रमुख उवस्थितीत सकाळी 11 ते 1.30 वाजे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य महिला मेळावा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे होणार आहे,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील,आ डॉ सतीश अण्णा पाटील,महिला जिल्हाध्यक्ष सौ कल्पना पाटील,युवती जिल्हाध्यक्ष कु कल्पिता पाटील,राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील,जिल्हा बँकेच्या संचालिका सौ तिलोत्तमा पाटील,जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यासह महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.या मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ योजना पाटील,शहराध्यक्ष सौ आशा चावरीया,मा.सभापती सौ. ललिता बैसाणे, सौ अलका पवार,सौ रिता बाविस्कर,सौ कविता पवार, सौ.अश्विनी पाटील, अंतुर्ली-रंजाणे सरपंच शितल पाटील, नगाव सरपंच नुतन महेश पाटील यासह महिला पदाधिकार्यांनी केले आहे.