खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

माणसांप्रमाणेच वृक्षांना हळूवार जपणारा हरफनमौला अॅड. रियाजुद्दीन काझी

कुटुंबासह समाजात कधीही भरून न निघणारी निर्माण झाली पोकळी

अमळनेर (प्रतिनिधी), कायद्याचे सखोल ज्ञान, उत्तम संवाद आणि माणसांप्रमाणेच वृक्षांनाही हळूवार जपणारा आणि संगीताची आवड असणारा एक संवेदशील वकील म्हणून अॅड. रियाजुद्दीन काझी यांची अमळनेरात एक वेगळी छाप होती. शहरात कोणतेही गालबोट लागू नये म्हणून नेहमीच सामाजिक सलोख्यात पुढे असणाऱ्या अशा हरफनमौला काळाने हिरावून नेल्याने त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासह समाजात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अमळनेर शहरातील इस्लामपुरात राहणारे अॅड. रियाजुद्दीन अमिरोद्दीन काझी (वय ५६) यांचे गेल्या मंगळवारी सकाळी ११.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अमळनेर अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्षपदही भुषवले होते.
आठ भाऊ, एक बहीण अशा गोतावळ्याचे अॅड. रियाजुद्दी काझी धनी होते. ३० वर्षापूर्वी वडीलधारी मोठ्या भावाचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपसूकच त्यांच्या खांद्यावर आली. ही जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. सर्व नात्या गोत्यांना सोबत घेऊन चालत राहिले. त्यामुळे त्यांचा गोतावळा खूप मोठा होत गेला होता. कुटुंबासोबत समाजिक आणि मित्र मंडळीचा कंपूही तेवढाच मोठा होता. बोलके असल्याने सहज ते कोणालाही आपलसे करून घ्यायचे. याच खुबीने त्यांनी आपल्या गोतावळ्याचा वेल वाढवला होता. कायद्याचे सखोल ज्ञान, पीडिताला न्याय मिळवून देण्याची तळमळ असल्यानेच वकिली क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा होता. म्हणून अमळनेरात ते एक नामांकीत वकील म्हणून प्रसिद्ध होते. जात, धर्म, पंथाच्या पलिकडे त्यांच्या विचारांची प्रगल्भता होती. म्हणूनच ते हिंदू बांधवांच्या सणातही हिरहिरीने भाग घेत होते. सामाजिक सलखो राखण्यात तर त्यांचा पुढाकार होता. सर्वसामान्य मानसापासून ते आमदार, खासदास, नगराध्यक्ष, लोकप्रिनिधी, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते प्रत्येक समाजाला घेऊन चालायचे. संगीतप्रेमीही असल्याने ते अनेकदा संगीत ऐकण्यात रमायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले व ६ भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. एक मुलगा औरंगाबाद हायकोर्टात तर दुसरा मुलगा मुंबई हायकोर्टात वकिली करत आहे. पत्नी इंग्लिश मीडियमला टिचर आहे. अशा भरल्या कुटुंबातून त्यांची अचानक एक्झिट झाल्याने काझी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोससळला आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुख पेलण्याची ताकद देवो, ही खबरीलालकडून भावपूर्ण श्रद्धांजली आहे…

जगाचा निरोप घेता भागवली वृक्षांची तहाण

अॅड. रियाजुद्दीन काझी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता अमळनेर न्यायालयात पोहोचले आणि त्यांनी रोजच्या सवयीप्रमाणे तेथील झाडांना पाणी घातले आणि काही वेळातच छातीत दुखू लागल्याने त्यांना त्यांचे लहान भाऊ अॅड. शकील काझी व इतर वकिलांनी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. निखिल बहुगुणे यांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांनी या जगाचा निरोप घेतला पण तेही वृक्षांची तहाण भागवून, अशा या वृक्षप्रेमाच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

किसीका नाम लेना नही, उपरवाला देखता है

अॅड. रियाजुद्दीन काझी व्यवसायाने वकील असले तरी, कोणाचे नाव घेऊ नेय, रिकामे कामे करू नये, परमेश्वर हे सर्व पाहत असतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ देतो, अशी शिकवण ते नेहमी आपल्या हितचिंतकांना देत होते. म्हणून ते नेहमी सांगायाचे किसीका नाम लेना नही, रिकामे काम करना नही, उपरवाला देखता है, जो बुरा करेंगा उसका बुरा होंगा, जो अच्छा करेंगा उसका अच्छा होंगा, अपणा अपणा काम करने का, अशी समजवण्याची भूमिक अनेकांनी अनुभवल्याने त्यांना अॅड. रियाजुद्दीन काझी यांची आजही भासू लागली आहे.

अॅड. शकील काझींवर मोठी जबाबदारी

मोठ बंधू अॅड. रियाजुद्दीन काझी यांच्या जाण्याने अॅड. शकील काझीवर सर्व जबाबदारी आली आहे. स्वतःसह रियाज काझी यांच्या पक्षकारांना त्यांच्या पद्धतीने सांभाळण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. न्यायाची भूमिका, त्यांची उनीव भरून निघणार नाही, पण त्यांची उणीवही कुंटूंबासह हितचिंतकाना भासणार नाही, असे काम शकील काझी यांना करावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button