खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर…

अमळनेर(प्रतिनिधी) येथिल डी.आर.कन्या शाळेत काल रविवारी जळगांव जिल्हा खाजगी शिक्षकेत्तर संघटना,कर्मचारी संघाची बैठकित अमळनेर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी संघटीतपणे शासनाच्या खाजगी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी विरोधी धोरणाच्या बाबत लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद दिलीप महेश्री उपस्थित होते.खाजगी शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी, व संघटनेच्या सदस्यांनी विविध प्रश्न मांडले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद महेश्री,यांनी” मागील पदाधिकाऱ्यांचा भेदभाव त्वरित संपवावा यासाठी संघटीतपणे व्हा. लढा द्या!”असे आवाहन याप्रसंगी संघटनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना केले. मार्गदर्शक भाऊ घासकडवी, यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित जिल्हा संघटनेचे अध्यक्ष यांनी ,”संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनस्तरावर सोडविण्यासाठी  सर्वोतोपरी संघटीतपणे प्रयत्न करू!”असे आवाहन अध्यक्षीय भाषणात केले.
यावेळी जिल्हा कार्यध्यक्ष योगेश भोईटे, आर.डी. बोरसे,शरद सुर्वे, यांच्या उपस्थितीत शिक्षकेत्तर संघटनेचे कैलास जगन्नाथ पाटील,यांची अमळनेर तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष प्रमोद देविदास बहिरम,सचिव चौक भाऊसाहेब,व तालुका सदस्यपदी अजय पाटील, विनोद सोनवणे, बाळू पाटील, रवींद्र चव्हाण,अजय सूर्यवंशी,श्याम पवार, सुभाष पाटील, रविंद्र पाटील, श्रीकांत कुलकर्णी, जितेंद्र ठाकूर, प्रभाकर पवार, अभिजित बागुल, मार्गदर्शक भाऊ घासकडवी, एस.एन.पाटील,यांची महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटनेची १८ सदस्यांची तालुका कार्यकारणीत निवड सर्वानुमते करण्यात आली.यावेळी तालुक्यातील शेकडो शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *