समाजाच्या प्रगती आणि एकजुटीकरिता महा-अधिवेशनात कोणतेही राजकारण नाही – अध्यक्ष कैलास वाणी

अमळनेर (प्रतिनिधी)-समाजाच्या एकजुटीकरिता आणि भविष्यात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातून शोधून समाजाची प्रगती होऊन सर्व समाज बांधव मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे येथे अखिल भारतीय लादशाखीय वाणी समाजाचे महाधिवेशनाचे आयोजन दि २४/२५ नोव्हेंबर मध्ये होणार असल्याची माहिती या महाधिवेशनाचे अध्यक्ष कैलास वाणी यांनी अमळनेर येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
यात ते पुढे म्हणाले की,प्रामुख्याने समाज हा जळगाव,धुळे,नाशिक,पुणे,मुंबई या जिल्ह्यांमध्ये असून आम्हीही याच खान्देशातील आहोत पण उद्योग,व्यवसाया निमित्त शहराकडे वळलो असून खेडोपाडी असलेला समाज सक्षम व्हावा तो एकत्र यावा याकरिता महा अधिवेशनाचे आयोजन केले आहे.यात २५० विविध विषयांचे स्टॉल लावण्यात आले आहे.तर या दोन दिवसात विविध क्षेत्रातील उद्योगातील तरुणांना नवनवीन माहिती मिळावी यासाठीही मान्यवरांना बोलाविली आहे.यात पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे,काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कार्यक्रमाचे आमंत्रण देत कोण- तेही राजकारण होऊ नये असा मानस आहे.तर २५ तारखेला गुरुमाऊलींच्या हस्ते विविध कार्यक्रम होणार आहे. जेणे करून व्यवसाय व उद्योग यामुळे समाजातील तरुणांचे लग्न होण्यास खूप अडचणी येतात त्या दूर व्हाव्ह्यात हेच ध्येय आहे.यानंतर समाजातील ३०० गरीब मुलांची दत्तक योजना त्यांचे रहाणे, शिक्षणाचा खर्च,समाजातील निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून यातून समाज प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ.अधिवेशना नंतर वाणी चेंबर्स ऑफ कॉमर्स ची स्थापना करून पुणे येथे बालेवाडी जवळ ५०० मुलामुलींसाठी वसतिगृह तसेच या पाचही जिल्ह्यातून पुण्यात दवाखाना,खाजगी काम,इतर कामासाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी रहाण्याची व्यवस्थाही या ठिकाणी होईल असा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महा धिवेशनातील स्वागताध्यक्ष राजेंद्र वाणी मुंबई,सचिव राजेश कोठावदे,जळगांव जिल्हा समन्वयक गजानन मालपुरे, सहसचिव शशिकांत येवले, खजिनदार शामकांत शेंडे, सहखजिनदार अजय मालपुरे, कळवन,राज्य समन्वयक,राजेंद्र पाचपुते,गोविंद शिरोळे, धिरज येवले सर्व कार्यकारणी सदस्य अमळनेर येथील समाजाचे अध्यक्ष योगेश येवले,सुनील भामरे,संजय अलई,श्याम पुरकर, महेश कोठावदे,खा शि मंडळाचे संचालक हरी भिका वाणी,बापू वाणी,अनिल वाणी,अजय केले, बाळासाहेब नेरकर,जितेंद्र वाणी, रांगोळीकार नितीन भदाणे, प्रकाश अमृतकार,नाशिक जिल्हा महिला समन्वय उषा बागडे, योगेश येवले, सुनिल वाणी,प्रकाश  मेखा,नितिन भदाने,शामकांत पुरकर,विजय कोठावदे, संजय अलई, जितेंद्र राणे,अनिल वाणी, सरीता कोठावदे, पुष्पा भामरे अमळनेर समन्वयक रंजना देशमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *