खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्यालयात वाचक वीर स्पर्धेत प्रथम दुर्गेश पाटील, द्वितीय प्रतीक कड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक डी. ए. धनगर यांनी वाचकवीर स्पर्धा घेतली. त्यात प्रथम दुर्गेश ईश्वर पाटील, द्वितीय प्रतीक भरत कड आणि तृतीय विवेक परमेश्वर निकम आले.
वाचन संस्कृतीचे जतन संवर्धन व वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक धनगर प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्यांनी वर्ग ग्रंथालय योजना सुरू केली आहे. त्यानंतर त्यांनी वाचकवीर स्पर्धा घेतली. सध्या व्हाट्सअप फेसबुकच्या जमान्यात विद्यार्थी वाचनापासून दुरावलेले जाणवतात. त्यांच्यातील वाचनाविषयीचे नैराश्य झटकून त्यांना वाचनाला प्रवृत्त करण्यासाठी वर्ग ग्रंथालय योजनाही प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी वाचायला लागले आहेत. त्यांची विचार प्रक्रिया गतिमान झालेली आहे. स्वतःचा विचार विद्यार्थी स्वतः करून इतरांना वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत. इतर विद्यार्थ्यांनाही यातून प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थी खरोखर वाचतात का याचा पडताळा प्रबोधनदूत धनगर हे घेत असतात. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव संदीप घोरपडे, अध्यक्ष हेमकांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button