खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

हिस्टिशिटर आणि अंडरवल्डचा दाउद समजणार्‍या गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

अमळनेर (प्रतिनिधी) हिस्टिशिटर आणि अंडरवल्डचा दाउद समजणार्‍या गुन्हेगारास अमळनेर पोलिसानी मोठ्या शिताफीने तीन गुन्ह्यात अटक करून मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलिस ठाण्यात हिस्टिशिटर असलेला आणि स्वतास अंडरवल्डचा दाउद समजणारा गुन्हेगार शुभम उर्फ शिवम मनोज देशमुख (रा. लाकडी बखारीचे मागे सविधान चौक) यांस मोठ्या शिताफिने पकडुन तो फरार असलेल्या तीन गुन्ह्यांत अटक केली आहे.
त्याच्यावर आता पर्यंत चोरी, खुनासह दरोडा, मोक्का, जबरी चोरी, घरपोडी, अशा प्रकारचे २७ गुन्हे दाखल असून तो माहे आगष्ट / २०२२ पासुन जामीनावर सुटुन बाहेर आला होता. त्याने घरात घुसुन जबरी चोरी तसेच दोन मोटर सायकलीचे चोरीचे गुन्हे केले होते. त्यात तो फरार होता. त्याला जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार  लवकरात अटक करण्याचे निर्देश दिले होते . त्यावरुन अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद आरोपीताचा शोध घेणे सुरु होते . त्यावरुन आज दिनांक २५/११/२०२२ रोजी धुळे शहरात त्याच्या बहीणी कडेस आला असल्याची गोपणीय माहीती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.
त्यांच्यासह पोउपनि अनिल भुसारे , पोहेकौं सुनिल हटकर , पोना मिलींद भामरे , पोना  सूर्यकांत साळुंखे , पोका अमोल पाटील , पोकों  निलेश मोरे , पोका  समाधान पाटील अश्यांसह धुळे येथे जावून त्याचे बहीणेचे घरातुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे. त्याचेवर अमळनेर पोलीस स्टेशनला जबरी चोरी व मोटर सायकल चोरीचे तीन गुन्हे दाखल होते . सदर गुन्ह्यांत तो फरार होता . सदर गुन्ह्यांत त्यास अटक करण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button