खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अनधिकृत बॅनर, होर्डिगप्रकरणी नगरपालिकेकडून कारवाईचा दणका

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अनिधिकृत बॅनर, होर्डिगप्रकरणी खबरीलालमध्ये वृत्त प्रकाशित होताच नगरपालिकेने कारवाईस सुुरुवात केली. नगरपालिकेच्या पथकाने हे बॅनर, होर्डिंग काढून नोटिस बजवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
डिजदिटल बॅनर, होर्डिगमुळे कमी पैशात अधिक प्रसिद्धी मिळत असल्याने अमळनेर शहरात आशा अनिधिकृत बॅनर, होर्डिगचा उत आला होता. यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचा कर बुडत होता. तसेच शहराचेही विद्रुपीकरण होत होते. तसेच अपघाताचाही धोका वाढवा होता. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. तर ५ हजार रुपये बॅनर्स लावण्याची फी आतापर्यंत जमा झाली आहे.

धनश्री ग्राफिक्सला शुल्कासह दंडाची नोटीस

शहरातील धनश्री ग्राफीक्सने शहरात विविध ठिकाणी जाहिरातींचे लावले आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. म्हणून त्यांना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नोटीस काढून २४ हजार रुपये फी आणि ५ हजार रुपये दंड भरण्याची नोटीस काढली आहे. सात दिवसाच्या आता फि आणि दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नोटिसीद्वारे मुख्याधिकारी सरोदे यांनी दिला आहे.

नोटीस देण्यात दुजाभाव

दरम्यान, शहरात धनश्री ग्राफीक्सह अन्य काहींनी बॅनर्स आणि होर्डिंग लावले होते. पंरतु केवळ धनश्री ग्राफीक्सला फी आणि दंडाची नोटिस देण्यात आहे. त्यामुळे असा दुचाभाव का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button