माजी आमदार साहेबराव पाटीलसह विक्रांत पाटील शिंदे शिवसेनेच्या तंबूत सहभागी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मूळ शिवसेनेच्या कार्यालयच सुरेश पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना कार्यालय (शिंदे गट) उघडले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार साहेबराव पाटील आणि सर्वपक्षीयचे विक्रांत पाटील यांनी हजेरी लावल्याने ते शिंदे गटात असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळेच आगामी नगरपालिका निवडणुका या अत्यंत चुरशीचा होणार आहे.
एकनाथ शिंदे गटाचा कार्यकर्ता सुरेश पाटलांनी कार्यालय सुरू केले आहे. या आधी ते शिवेसनेचे होते. त्यामुळे पुन्हा भविष्यात यात कोणते कार्यालय उघडेल ते काळच ठरवणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी व्हाया भाजपात असलेले विक्रांत पाटील आणि माजी आमदार साहेबराव दादा हे राष्ट्रवादीत असल्याचे सांगत असले तरी ते आता शिंदे गटातच आहे हे आता लपून राहिलेले नाही. तर त्यांच्याकडे आमदार अनिल पाटील यांचे बारीक लक्ष असून ते याबाबत वरिष्ठ नेत्यांना अहवाल देऊ शकतात. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत राजकिय वातावरण ढवळून निघणार आहे.
दरम्यान कार्यालय उद्घाटन प्रसंगी सुंदरपट्टीच्या माजी सरपंच सुरेखाबाई पाटील, माजी नगरसेविका रत्नमाला महाजन, यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर दीपक पाटील यांनी यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केले. सुंदरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील,यावेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, झाडी चे सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील, सुंदरपट्टीचे उपसरपंच मधुकर पाटील, रडावनचे सरपंच डोमन पाटील, लोणचे माजी सरपंच डॉक्टर रामराव पाटील जानवेचे सुरेश पाटील, आर्डीचे उपसरपंच किशोर पाटील आदी उपस्थित होते. कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मनोहर भांडारकर यांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिंदे गटाचे कार्यकर्ते यांनी मानले