राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा प्रयत्न
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून १८ डिसेंबर राेजी मतदान होणार आहे. अागामी दाेन वर्षात सर्वच माेठ्या निवडणुक हाेणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व अाहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त ग्रामपंचायती अापल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे.
राज्य निवडणुक अायाेगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ नाेव्हेंबर राेजी संबंधित तालुक्याचे तहसिलदारांकडून ग्रामपंचायत निवडणुकीची नाेटीस प्रसिध्द केली जाईल. तर २८ नाेव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात संबंधित उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार अाहे. दाखल अर्जांची छाननी ५ डिसेंबर राेजी हाेईल. तर माघारीची मुदत ७ डिसेंबरपर्यंत असणार अाहे. माघारीनंतर लगेच शिल्लक उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार अाहे. त्यानंतर गरज पडल्यास १८ डिसेंबर राेजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या काळात निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार अाहे. अाणि २० डिसेंबर राेजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमाेजणीची प्रक्रिया हाेऊन २३ डिसेंबर राेजी निकाल जाहीर करण्यात येणार अाहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने अाता ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापणार अाहे.
या ग्रामपंचायतीत उडणार धुराळा
तासखेडे, आमोदे, अंतुर्ली/ रंजाणे, नगाव बु. नगाव खुर्द, सुंदरपट्टी, हेडावे, कामतवाडी, रुंधाटी, मुंगसे, गंगापुरी, भिलाली, ब्राम्हणे, जैतपीर, खापरखेडा, प्रडा. अंबारे, मारवड, वावडे, कन्हेरे, इंद्रापिंप्री, जानवे, चोपडाई, कोंढावळ, डांगर बु. आदी २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.