स्वामी समर्थ मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून भाविक आणि विद्यार्थ्यांना दिले सुरक्षा कवच

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी समर्थ मंदिराजवळ लोकसहभागागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या परिसरातील शाळेतील विद्यार्थी आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना एक प्रकारे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या उपक्रमातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्वामी समर्थ मंदिरात महिला , मुली , बालके , तरुण, वृद्ध सर्व प्रकारच्या भक्तांची गर्दी होत असते. तसेच याच भागात जी एस हायस्कूल तसेच इंदिरा गांधी प्राथमिक ,एन टी मुंदडा ,पी एन मुंदडा अशा चार शाळा असून दवाखाने व दुकाने देखील असल्याने किरकोळ चोऱ्या ,छेडखानी ,टवाळ मुलांचा त्रास रोखण्यासाठी,दवाखान्यातील गोंधळाला प्रतिबंध घालण्यासाठी डीवायएसपी राकेश जाधव यांनी पुढाकार घेत या परिसरात उत्तम दर्जाचे फोर के सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आग्रह धरला. परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांना आर्थिक सहभागाचे आवाहन केले. स्वतः डीवायएसपी राकेश जाधव यांनी १० हजार रुपये मदत केली , त्यांच्या सह उद्योगपती बिपीन पाटील ,डॉ विशाल बडगुजर, डॉ पुरुषोत्तम सूर्यवनशी, दीपक पाटील, सुनील चौधरी, मेघराज दाभाडे यांचेसह अनेकांचे योगदान मिळाले. लक्ष्मीपूजन निमित्त कॅमेऱ्यांचे पूजन व लोकार्पण करण्यात आले. या वेळी डीवायएसपी जाधव यांनी शहरात इतर बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या करणारे गुन्हेगार कसे सापडले आणि दंगलीत खरे आरोपी कसे पकडण्यात आले. याबाबत नागरिकांना महत्व पटवून दिले. अनेकदा चोर चोऱ्या करून डीव्हीआर देखील चोरून नेतात म्हणून डीव्हीआर कोणाकडे ठेवला आहे. याचीही गुप्तता पाळण्यात आली आहे. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले. या वेळी दिपक मेडिकलचे संचालक दीपक पाटील, बाळासाहेब देशमुख, राजेश कोठावदे,जितू देशमुख, उमेश पाटील, राजू दाभाडे, दीपक काटे , जगदीश पाटील, अल्का गोसावी, पद्माकर अप्पा, गजू साळुंखे, उज्ज्वल पाटील, बीएसएनएलचे दिलीप पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *