संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद बहुजन समाजाचीही चळवळ

परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन

अमळनेर (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद बहुजन समाजाची ही चळवळ आहे. संघटनेची ताकद काय हे आपल्याला कार्यरत झाल्यावर कळेल ,मैत्री प्रेम आकर्षक या संकल्पनेवर मुलींसाठी “कळी उमलली” हे अभियान आपण राबवित आहोत,शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण झटणार आहोत,तरुणांचे प्रश्न मांडून त्याला वाचा आपल्याला फोडायची आहे,संघटना जिवंत ठेवायची असेल तर क्रियाशील राहावे लागेल चांगले काम करा आणिकाही अडचण आल्यास आम्ही पाठीशी आहोतच अशी भावना परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी केले.
अमळनेर येथे अंबिका मंगल कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरणाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील उपस्थित झाल्या होत्या. या वेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्षा शारदा पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष यामिनी पाटील, विभागीय अध्यक्ष अर्चना पाटील, विभागीय कार्याध्यक्ष अर्चना पाटील उपस्थित होत्या. सुरवातीला प्रास्तविक जळगाव जिल्हा अध्यक्षा वैशाली शरद शेवाळे यांनी केले. यानंतर जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मनीषा संजय शिरसाठ, जिल्हा प्रवक्ता संजय पाटील, जिल्हा संघटक प्रशांत भदाणे, जिल्हा सल्लागार कैलास पाटील तर दहिवद ग्राम अध्यक्ष भागवत सोनवणे, ढेकू खुर्द अध्यक्ष किरण जाधव, टाकरखेडा किशोर पाटील,बहादरवाडी प्रेमसिंग पाटील,रणाईचे समाधान पाटील,लोण चारम ज्ञानेश्वर राठोड,मांडळ अरुण वाघ आदींना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, जिल्हा प्रवक्ते प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, डॉ. शरद शेवाळे, जिल्हा सचिव स्वाती पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष वर्षा पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मीना संैदाने यांनी केले. आभार किशोर ठाकरे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *