वन विभागने शवविच्छेदन करून केले अंत्यसंस्कार
अमळनेर (प्रतिनिधी) कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीटचे पिल्लू ठार झाल्याची घटना तालुक्यातील नंदगाव लाडगाव शिवारात घडली. वन विभागने शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदगाव लडगाव येथील गट नबर ८७ शिवारात असलेल्या अंबादास शांताराम पाटील यांच्या शेताच्या बाजूला हरिण मेलेल्या अवस्थेत पडलेली होती. सदर घटनेची नंदगाव पोलिस पाटील विलास पाटील यांनी माहिती दिली.
याबाबत घटनास्थळी वनपाल पी. जी. सोनवणे, वनरक्षक सुप्रिया पाटील यांनी भेट देऊन मृत काळवीटची पाहणी केली. त्यानंतर ते काळवीट अमळनेर याठिकाणी आणले. या वेळी पशुसंवर्धन अधिकारी प्रतिभा कोरे यांनी पाहणी करून शवविच्छेदन केले. त्यानंतर वनरक्षक रामदास वेलसे, वनमजुर ज्ञानेश्वर पाटील यांनी काळविटावर अंत्यसंस्कार केले. या काळवीटाच्या मागच्या पार्श्वभागावर चावा घेऊन घायाळ केले होते.