खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनानिमित्त रंगली वक्तृत्व स्पर्धा

समाजकार्य महाविद्यालय आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील माजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. एकविसाव्या शतकातील समतेची आव्हाने या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑक्टोबर १९३२ रोजी केली होती. त्यास ९० वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी तथा स्पर्धेचे परीक्षक जयश्री पवार डॉ. राहुल इंगळ उपस्थित होते. प्रस्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. भरत खंडागळे यांनी केले. स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकविसाव्या शतकातील समतेची आव्हाने यावर आपले मत मांडले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे शितल बाविस्कर, तेली फाविक, दीपक विश्वेश्वर यांनी तर उत्तेजनार्थ निशिगंधा पाटील व दिव्या पाटील यांना मिळाला. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी परीक्षक जयश्री पवार व डॉ. राहुल इंगळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षा व यशस्वी करिअर साठी बहूमोला असे मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक अभिजीत भंडारकर यांच्या उपस्थितीत अतिथींच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी अश्विनी पवार व आभार प्रदर्शन शितल बाविस्कर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी योगेश पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी मार्गदर्शन केल. तसेच महाविद्यालयातील आयक्यूएसी समितीचे समन्वयक प्रा. विजयकुमार वाघमारे व प्रा. धनराज ढगे, डॉ. श्वेता वैद्य, डॉ अस्मिता सर्वेय्या, डॉ. अनिता खेडकर, डॉ. एस.आर. चव्हाण, डाॅ. सोनवणे, प्रा. बोरसे, अनिल वाणी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button