खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये लोक सहभागातून बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये लोक सहभागातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यामुळे चोरीसह अन्य गुन्हे उघडकीस येण्यासाठी मदत होणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी अमळनेर शहरात बैठका, कॉर्नर सभा घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याची जनजागृती मोहीम सुरू केली आहे. लोक सहभागातून निधी गोळा करीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्र 6 च्या प्रोफेसर कॉलनी चौकात लोक सहभागातुन बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळा घेण्यात आला. आणि पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी अधिकारी राकेश जाधव यांचा सत्कार करून व जेष्ठ शेतकरी पूरषोत्तम अण्णा यांच्या हस्ते नारळ फोडून लोकार्पण सोहळा पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button