खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शेतात शॉर्ट सर्किटने आग लागून तीन लाखांचा उस जळून खाक

अमळनेर (प्रतिनिधी) शेतात शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे तीन लाखांचा उस जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कळमसरे येथे घडली. यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजुसिंग प्रतापसिंग पाटील (रा. कळमसरे, हमू शिरपूर) याने निम शिवारात असलेली शेती गोपाल पंडित पाटील यांना करायला दिली आहे. त्यांनी शेतात उसाच्या दुरीचे पीक ठेवले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक निम गावाकडे जाणाऱ्या वीज तारांचे शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उसावर पडल्याने दोन एकर शेतातली उसाला आग लागली. अग्निशमन दलाच्या पाचारण केल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आली. यात शेतकऱ्याचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. पोलिसात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button