खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शाळेत परीक्षेला गेलेली मुलगी बेपत्ता, पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी ) शाळेत परीक्षेला गेलेली मुलगी बेपत्ता झाल्याची घटना १४ रोजी तालुक्यातील कळमसरे येथे घडली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाडळसरे येथील अल्पवयीन मुलगी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे शिकत असून १४ रोजी ती सकाळी परीक्षेला गेली. तिच्या घरातील लोक शेतात मजुरीसाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. म्हणून तिच्या आईने मारवड पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीने मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार केल्याने अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button