खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे पारंपारिक पद्धतीने दसरा सण साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे पारंपारिक पद्धतीने दसरा शाळेत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेची पूजन शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे यांनी केले.
विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय पारंपारिक सण उत्सवाचे ज्ञान देण्याचा आणि त्यातून संस्कार घडवून आणण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता .शाळेतील प्राथमिक विभागातील पूनम पाटील यांनी दसरा या सणाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .विद्यार्थ्यांना दसरा हा सण का साजरा केला जातो? याविषयीचे ज्ञान देण्यासाठी इयत्ता सहावी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुबक अशी नाटिका सादर तयार केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्न विचारून छोट्या खाणीत स्पर्धा घेण्यात आली .अशा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत कुमार देवरे यांनीही अगदी मार्मिक शब्दात विद्यार्थ्यांना दसरा सणाचे व आपल्या पारंपारिक उत्सवाचे ज्ञान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागातील सोनाली पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी रावणाचे दहन

कार्यक्रमाच्या शेवटी रावणाचे दहन करण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये असलेल्या वाईट भावना म्हणजेच अहंकार , गर्व, मत्सर , द्वेष , ईर्षा या गोष्टींचा त्याग करण्याचे सांगितले आणि त्यातून योग्य व्यक्ती कसा निर्माण होईल असा मौलिक संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button