खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, लवकरच प्रक्रिया सुरू होणार

मुदत संपलेल्या पतसंस्था, अर्बन बँक, बाजार समितीत उडणार धुराळा


अमळनेर (प्रतिनिधी) मुदत संपलेल्या आणि प्रशासक बसलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे. तर अमळनेर येथील विविध पतसंस्था, अर्बन बँक, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना काळांत अनेक सरकारी संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. मात्र संसर्गाचे प्रमाण मोठे असल्याने या संस्थानच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. अनेक संस्थावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ३० सप्टेंबर रोजी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव यांनी निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध पतसंस्था आणि प्रसिद्ध अर्बन बँक यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुक चाचपणी करत आहेत. निवडणुकीचे वातावरण निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button