१ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचेही भूमिपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री येथे ०४ योजनेंतर्गत ८० लाखाच्या नाल्यावरील मोठ्या पुलाचे लोकार्पण आणि जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटींची पाणीपुरवठा योजना आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच प्रविण पाटील, सरपंच धर्मेंद्र पाटील, उपसरपंच सुनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य छायाबाई पाटील, वि.का.सो. चेअरमन मनोहर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पोलिस पाटील प्रविण सोनवणे, माजी सरपंच वल्लभराव पाटील, सुनिल पाटील, रामदास पाटील,डॉ. जिजाबराव पाटील, मालोजी पाटील, मोहन पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील, भरत पाटील, छगन पाटील, दगडू सोनवणे, संजय पाटील, देविदास पाटील, छोटू वाणी अनिल भिल, सुनिल भिल, सुखदेव भिल, संजय सोनवणे, संजय भिल,भगवान पाटील, भूषण सोनवणे,नितिन सोनवणे, अमृत सोनवणे, अजय सोनवणे, शिवदास सोनवणे, वाल्मिक ठाकरे, शालीक ठाकरे, भानुदास भिल तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकास कामांचाही झाला शुभारंभ
या वेळी २५१५ अंतर्गत १० लाखाच्या निधीतून काँक्रीट रस्ता तयार करणे, आमदार निधीतून १५ लाखाच्या निधीतून अनुसूचित जमातीसाठी समाजमंदिर बांधणे आणि डी. सी.पी.अंतर्गत ४० लाखाच्या निधीतून मराठी शाळेला वॉलकंपाऊंड करणे आदी कामांचेही भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.