अमळनेर (प्रतिनिधी) गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव तसेच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील भागातून तसेच संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील रूट मार्च हा पाच पावली देवी पासून पवन चौक, झामी चौक, बादरपूर नाका, भोईवाडा, माळीवाडा, कसाली मोहल्ला, संत सखाराम वाडी संस्थान, पान खिडकी सराफ बाजार, दगडी दरवाजा, शहरातील मुख्य बाजारपेठ, झाशी राणी चौक गांधीपुरातील संमिश्र वस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला. यात अमळनेर पोलीस स्टेशनचे ८ अधिकारी, ६४ पोलीस अंमलदार, ३८ होमगार्ड, १ आरसीपी, १ पोलिस मुख्यालयकडील स्टकिंग फोर्स, आरएएफ रॅपिड ऍक्शन फोर्सचे १ मेजर, १२ अधिकारी व ८७ कर्मचारी सहभागी झाले होते.