खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

जीर्ण इमारतीचा काही भाग पडण्यासाठी गेलेल्या चौघांना केली जबर मारहाण

मारहाण करणार्‍या सात जणांविरोधात पोलिसांत दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग पडण्यासाठी गेलेल्या चौघांना सात जणांनी जबर मारहाण केल्याची घटना स्टेशन रोडवर ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यातील जखमींनी दवाखाण्यात उपचार केल्यानंतर सात जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील स्टेशन रोडवरील मेहुल भांडारकर यांची इमारत जीर्ण झाली असल्याकारणाने नगरपालिकेने त्यांना वरचा मजला पाडण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार मुकादम शब्बीर नजीर पठाण , मजूर नासिर बशीर टकारे , रुस्तम पठाण ,इकबाल सरदार हे ३० ऑगस्ट रोजी इमारत पाडण्यासाठी गेले असता त्याठिकाणी योगेश राजपूत ,अशोक फालक , सुरेंद्र फालक , सुमित राजपूत ,धवल राजपूत , जयेश राजपूत ,गोपाल पाटील यांनी इमारतीचा जीर्ण भाग काढण्यास विरोध करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली , तर योगेश याने हातातील वीट टकारे याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. मेहुल भांडारकर यांनाही चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. काही लोकांनी भांडण सोडल्यानंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर टकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button