खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सारबेट येथे दीड कोटींचा पूलासह ४२ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेट येथे दीड कोटींचा पूल आणि ४२ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे पाण्यासह दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मतदारसंघातील सारबेटे बु. आणि सारबेटे खु. या दोन्ही गावात आमदार अनिल पाटील यांनी उल्लेखनीय विकासकामे दिल्याने या विविध विकाम कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदारांच्या हस्ते संपन्न झाले.
सारबेटे बु. आणि सारबेटे खु. या दोन्ही गावातून प्रामुख्याने वाहणाऱ्या नाल्यावर दीड कोटी निधीतून ०४ योजने अंतर्गत पूल बांधकाम करणे व सारबेटे बु गावात जलजीवन मिशन अंर्तगत ४२ लाखाची पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. किरण पाटील, प्रा.सुरेश पाटील, एल.टी. पाटील, महारू आण्णा, निलकंठ तात्या, भैय्या पाटील, बाळू पाटील, महेश पाटील, मधू आबा, पंकज पाटील, अलीम मुजावर, माजी सरपंच रज्जाक मेवाती, उपसरपंच नईम मेवाती, अरुणखा मेवाती, ग्रा.पं.सदस्य, अमजतखान मेवाती, ज्ञानेश्वर कोळी, शकील मेवाती, मेहमुदखान मेवाती, हसन मेवाती, बशीर मेवाती, ईसुक मेवाती, अमिन मेवाती, इस्त्राईल असम, असम दादा, रफिक मुल्ला, रफीक भैया, फारुक सर, सरदार मिस्तरी, उपसरपंच असलम खान, रऊफ भाई, मोहम्मद भाई, मुस्तकीन शहा, इरफान वाईफ शमीक मजीद, नजीम कईम, असलम मुमताज, मम्मु मिस्तरी वकील शेट.तसेच देवराम पाटील, गणेश गुलाब पाटील, नबी सरदार, साबीर ईस्माईल, इरफान गफुर, जावीद इमदाद, उस्मान रहीम, सादीक कादर, बिस्मीला उमर, मजीद बशीर, युसुफ रहेमान, अशीर हमीद, राजेंद्र कोळी, शरद कोळी, लक्ष्मण कोळी, गफ्फार सरदार, सुभान मिस्तरी, जाकिर मिस्तरी, अलीम मेहबुब, मुमताज दादा, मोहमंद जहूरभाई, अली रज्जाक, युनुस युसुक, मनुस सांडू, हमीद मिस्तरी, जुबेर उमर, खलील मलन, अशपाक अहमद, ज्ञानेश्वर पाटील, विशाल ब्रम्हे, नाना ब्रम्हें, मसुद मज्जीद, अलताब रऊफ, रऊफ पटेल, रसुल शकुर, मजर अलम, जावेद लतीफ, जकीर कासम, जाकीर जमील, हरुन करीम, इजाज रफीक यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, कार्यकर्ते, पदाधिकरी उपस्थित होते.

सारबेटे खु.येथे होणार ही कामे

आमदार निधीतून सारबेटे फाटा ते सारबेटे खडीकरण व डांबरीकरण करणे ( २५ लाख रुपये),सामाजिक न्याय विभाग- रास्ता काँक्रेटीकरण करणे (५ लाख रुपये),सामाजिक न्याय विभाग काँक्रीट गटार करणे (३.३५ लाख रुपये)

सारबेटे बु.येथे होणार ही कामे

आमदार निधीतून सभामंडप बांधकाम करणे ( १५ लाख रुपये), जलजिवन मिशनंतर्गत गावात पाणी पुरवठा करणे रक्कम (४२.६२ लाख रुपये), डी.पी.सी अंतर्गत मराठी शाळेला वॉल कंपाऊंड बांधणे ( २०.६३ लाख रुपये) ०४ योजनेअंतर्गत पुल बांधकाम करणे ३ महिन्यात पूर्ण करणे (१५० लाख रुपये)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button