५०० रुपयाची लाच मागणाऱ्या मारवड पोलिसाला अटक..

अमळनेर तालुक्यातील मारवड पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारा संजय रमेश बोरसे, वय-४२, पोलीस नाईक रा.शास्त्री नगर,कृषी कॉलनी जवळ,अमळनेर यांनी तक्रारदार यांचे पासपोर्ट पडताळणी करण्याच्या मोबदल्यात, तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ५००/₹ लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्यांचे विरुद्ध मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व त्यांच्या पथकाने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *