तालुक्यातील सबगव्हाण गाव झाले जळगाव जिल्ह्यातील पहिले ‘लोकराज्य ग्राम’..

अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव,- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत आज सबगव्हाण ता. अमळनेर हे गाव जळगाव जिल्ह्यातील यावर्षीचे पहिले ‘लोकराज्य ग्राम’ झाले आहे.
सबगव्हाणचे सरपंच श्री. नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्याकडे गावातील प्रत्येक कुटूंबाचा लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीचा धनादेश सुपूर्द केला.शासनाच्या योजनांची माहिती गावपातळीवरील नागरीकांना होण्यासाठी लोकराज्य मासिकाचा उपयोग होणार असून यामुळे ग्रामस्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार असल्याने सबगव्हाण गावाबरोबरच इतर गावांनीही असा उपक्रम राबविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्री. माने यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, सबगव्हाणचे ग्रामसेवक दिलीप मोरे आदि उपस्थित होते.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *