तालुका महसूल, शिक्षण विभाग आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी ) कारगिल युद्ध नाटिका, पथनाट्य, देशभक्तीपर गीते, सामूहिक नृत्य आणि शेरोशायरीतून देशभक्तीचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोष करण्यात आला. स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
तालुका महसूल विभाग ,शिक्षण विभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, गटशिक्षणाधिकारी एस. पी. चव्हाण, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संदीप घोरपडे, संजय चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते, स्वराज्य महोत्सवात झेंडे बनवणारे बचत गट, वक्तृत्व, रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ, प्रशांत ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील, रणजित शिंदे, सुनील वाघ, डॉ. अपर्णा मुठे, प्राचार्य रवींद्र माळी, विस्तार अधिकारी पी. डी. धनगर यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या शाळा आणि गायकांनी नोंदवला सहभाग एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल , खोकरपाट जि प प्राथमिक शाळा , सानेगुरुजी शाळा, स्वामी विवेकानंद स्कूल, अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल ,न्यू व्हिजन स्कूल , लोकमान्य शाळा ,सायरादेवी बोहरा स्कूल, पर्ल इंग्लिश मिडियम स्कूल, सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, मोरया नाट्य संस्था, अल्फाईज उर्दू स्कूल, नवीन मराठी प्राथमिक शाळा, डी. आर. कन्याशाळा, शाहरूख सिंगर, मुन्ना शेख, अपेक्षा पवार, संजय पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.