खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्याब्रेकिंग

शिंदे गटाचे सुरेश अर्जुन पाटील यांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी जाऊ नये

जळगाव जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचे शिवसैनिकांना आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकाजवळील शिंदे गटाचे सुरेश अर्जुन पाटील यांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी जाऊ नये, असे आवाहन जळगाव जिल्हा शिवसेनासह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे.
शिवसेनेचे बंडखोर तथा शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे मंत्री झाल्यावर अमळनेर मार्गे जळगाव गेल्यावर त्यांचे स्वागत करून अमळनेर येथील सुरेश अर्जुन पाटील हे शिंदे गटात गेले आहे. या पाश्र्वभूमीवर जळगाव जिल्हा शिवसेनासह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिवसैनिक बांधव आणि भगिनींना आवाहन केले आहे. सुरेश पाटील यांच्या कार्यालयात कोणत्याही शिवसैनिक बांधव आणि भगिनींनी जाऊ नये. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. तर अमळनेर तालुक्यातील शिवसैनिकांना लवकरच नवीन सूचना वरिष्टांच्या आदेशान्वय देण्यात येतील, असे ही वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button