खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार व राजे संभाजी मित्र परिवारतर्फे प्रभाग क्र.९ मधील धार्मिक प्रतिष्ठानांना राष्ट्रध्वज भेट

अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव निमित्त हर घर तिरंगा साजरा करण्यासाठी आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार व राजे संभाजी मित्र परिवारतर्फे प्रभाग क्र.९ मधील विविध धार्मिक प्रतिष्ठिनावर प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगा राष्ट्र ध्वज भेट देण्यात आला. तसेच महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
यात अब्बासिया मस्जिद, वसई देवी मंदिर, सिंधी हाऊसिंग सोसायटी मधील गुरुद्वारा मंदिर,जैन मंदीर, बोहरी समाज,पांचाळ वस्ती,शिवाजी बगीचा महादेव मंदिर ,संतोषी माता मंदिर , महाराणा प्रताप मित्र मंडळ आदि ठिकाणी संबंधित ट्रस्ट प्रतिनिधी, प्रमुखांना प्रतिनिधीक स्वरूपात राष्ट्रध्वज भेट देण्यात आला. या प्रसंगी पंकज चौधरी, युवा नेते आरिफ भाया, तथा राजे संभाजी मित्र परिवार,शिवशक्ती मित्र परिवार तथा आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button