खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची राज्यपालांकडे मागणी

आमदार अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली घेतली राज्यपालांची भेट

अमळनेर (प्रतिनिधी) विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार अनिल पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेऊन अमळनेर मतदारसंघात २०१९ साली अतिवृष्टी आणि २०२१ साली गुलाबी वादळ व अतिवृष्टीमुळेमुळे असंख्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची अग्रही मागणी केली.
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार,आमदार छगनराव भुजबळ, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह आमदारांच्या शिस्तमंडळाने मुंबई येथे राज्याच्या विविध प्रश्नांबाबत राज्यपालांची नुकतीच भेट घेतली. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर मतदारसंघातील विविध प्रश्न सादर करताना प्रामुख्याने नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यावर राज्यपालांचे लक्ष केंद्रित केले, यावेळी त्यांनी सांगितले की अमळनेर मतदारसंघात सप्टेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टी झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यानंतर २०२१ साली गुलाबी वादळ आणि अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील ८ मंडल आणि पारोळा तालुक्यातील २ मंडल यापरिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,दोन्ही वेळा या नुकसानीचे पंचनामे होऊन अहवाल शासनाला सादर झाला,तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी या दोन्ही प्रस्तावांना मान्यताही दिली. मात्र या शासनाने मदत देण्याचा विषय स्थगित करून शेतकऱ्यांचे पैसे रोखून धरले आहेत. तरी आधीच पीडित असलेल्या शेतकऱ्यांना ते पैसे तातडीने अदा करावेत अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली. यावर राज्यपालांनी सकारात्मकता दर्शविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button