खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

परिसर नासवणाऱ्या लॉजवर कारवाई करून लॉजच बंद करण्याची मागणी

मंगळनगर, ओंकारनगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील धरणगाव रोड, मंगळग्रहाजवळ उभारण्यात आलेल्या सुज्योत लॉजमध्ये अनैतिक चाळे सूरु असल्याने त्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे या लॉजवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांना पोलिसांकडे केली आहे.
अमळनेर पोलिस निरीक्षकांना मंगळनगर, ओंकारनगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात असलेल्या सुज्योत लॉजमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक चाळे सुरू आहेत. या लॉजमालकाला वेळोवेळी समज देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. आमचा पोटापाण्याचा विषय आहे, असे म्हणत अनैतिक कृत्य सुरूच आहे. त्यात दिनांक २२जुलै रोजी रहिवाशांनी दामिनी पथकाला पाचारण करून एका जोडप्याला या लॉजमधून रंगेहाथ पकडून दिले होते. त्यामुळे हे अनैतिक कृत्य बंद करून या लॉजवर कारवाई करावी, अशी मागणी नरेंद्र पाटील, समाधान पाटील, मनोज भोई, विनोद कोळी, अनिल ठाकरे, केशव नेमाडे आदी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button