खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सी.बी.एस.ई बोर्ड दहावीच्या परीक्षेत स्वामी विवेकानंद स्कूलचे 100 टक्के यश

विद्यार्थ्यांमधून सोहम खोरे (95:83%) आला प्रथम, पाठीवर कौतुकाची थाप

अमळनेर (प्रतिनिधी) सी.बी.एस.ई बोर्ड शुक्रवारी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचेने 100 टक्के यश मिळविले. विद्यार्थ्यांमधून सोहम खोरे (95:83%) हा प्रथम आला.
सी.बी.एस.ई बोर्ड दहावीचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला असून त्यामध्ये स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर या शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांमधून सोहम खोरे (95:83%), मयूर चव्हाण (94:50%), खुश पाटील (93:16%), श्रावणी देशमुख(92:00%),धनिष्क पाटील (88:33%) या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर टाकलेली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल तसेच शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button