खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी ) प्राचिन खेळाचा वारसा जपत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा करण्यात आला. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थीदशेत कला आणि शास्त्र यांचा मिलाप करून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके मिळवली. शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर तसेच शाळेच्या क्रीडा शिक्षिका हर्षदा सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.भविष्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन शाळेचे नावलौकिक करावे अशी सदिच्छा शाळेचे चेअरमननीरज अग्रवाल आणि मुख्याध्यापकहेमंत कुमार देवरे यांनी व्यक्त केली.
बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप इतिहासातील सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय खेळांपैकी एक असणारा, समानता, परस्पर आदर आणि समजूतदारपणा वाढविणाऱ्या बुद्धिबळ खेळाच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन १९६६ पासून दरवर्षी २० जुलै रोजी साजरा केला जातो. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button