डाॅ अश्विनी धर्माधिकारी डीएनबी परीक्षा सुवर्ण पदक पटकवून भारतात प्रथम

अमळनेर ( प्रतिनिधी ) : ज्या काळात वैद्यकीय शिक्षण एक स्वप्न झाले होते, त्या काळात अमळनेची सून डाॅ अश्र्विनी रोहित धर्माधिकारी यांनी डीएनबी (डिप्लोमॅट अाॅफ नॅशनल बोर्ड ) परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा मान पटकविला. दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या पदवीदान समारंभात प्रमूख अतिथी भारताचे उपराष्ट्रपती मा. श्री व्यंकैय्या नायडू यांच्या शुभहस्ते डाॅ अश्र्विनी धर्माधिकारी यांना सुवर्ण पदक अाणि गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात अाले.
डाॅ अश्विनी यांनी एम बी बी एस नागपूरहून पूर्ण केल्या नंतर डीएनबी परीक्षा व इनटर्नशिप पुण्याहून पूर्ण केली.
डीएनबी प्रथम परीक्षा नॅशनल बोर्ड अाॅफ एक्झामिनेशनस कडून घेतली जाते. या परीक्षेत अत्यंत तावून सुलाखून उत्तिर्ण होण्यार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३ ते ७ % अाहे.
डाॅ अश्र्विनी धर्माधिकारी या अार्ट अाॅफ लिव्हिंग अाणि प्राणी वाचवा संघटनेत काम करतात. दर वर्षी निदान एक महिना सामाजिक संस्थांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्याचा डाॅ अश्र्विनी यांचा मनोदय अाहे. अापले शिक्षण समाजोपयुक्त असावे असा सल्ला माननीय उपराष्ट्रपती यांनी पदवीदान समारंभात दिला अाहे. त्या वर डाॅ अश्र्विनी यांनी बेंगलोर येथील अार्ट अाॅफ लिव्हिंगचे श्री श्री रवी शंकर यांच्या संस्थे करीता अाणि हेमलकसा मधील डाॅ मंदाकिनी अामटे यांच्या डोंगराळ भागातील अादिवासी बांधवासाठी वेळ देण्याचा निश्र्चय डाॅ अश्र्विनी धर्माधिकारी यांनी केलेला अाहे. त्यांचे पती डाॅ रोहित धर्माधिकारी नॅशनल डिफेन्स कम्बाईन मेडिकल परीक्षेत देशात प्रथम अालेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *