खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू, पक्षांचे बॅनर, झेंडे हटवण्याचे आदेश

अमळनेर (प्रतिनिधी ) नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शहरातील राजकिय पक्षांचे बॅनर, राष्ट्रीय पक्षाचे झेंडे, राष्ट्रीय फलक, फोटो, भिंती पत्रके आदी काढून टाकण्याची कारवाई नगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य निरीक्षकांनी सर्व वॉर्ड मुकादम यांना आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने अमळनेरसह राज्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ कार्यक्रम जाहीर केला आहे.
तरी निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाली असल्याने आप आपल्या वॉर्डानिहाय राष्ट्रीय पक्षांचे बॅनर, राष्ट्रीय पक्षाचे झेंडे, राष्ट्रीय फलक, फोटो, भिंती पत्रके, सार्वजनिक ठिकाणी लावलेले असल्यास
तात्काळ काढण्याची कारवाई करण्यात यावेत. सदर कामाचा दररोज अहवाल सादर करणे, जेणे करुन निवडणुक आदर्श आचार संहिताचे भंग होणार नाही, ज्या प्रभागात राष्ट्रीय पक्षांचे बॅनर, राष्ट्रीय पक्षाचे झेंडे,
राष्ट्रीय फलक, फोटो, भिंती पत्रके आढळून आल्यास अश्या मुकादमांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button