खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

लोखंड कापताना शॉक लागून हेडावे येथील तरुण मजुराचा दु्र्दैवी मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) बांधकामच्या ठिकाणी लोखंड कापताना शॉक लागून हेडावे येथील सेंट्रींग काम करणाऱ्या तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना ढेकू रोडवर सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हेडावे येथील नंदकिशोर अशोक पाटील (वय ३५) हे सेंट्रींग काम करतात. ते ५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर जिजाऊ नगर येथे बांधकामाच्या ठिकाणी लोखंड कापत होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना लागलीच उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंदकिशोर याच्या पश्चत आई ,वडील , पत्नी ,दोन मुली , मुलगा असा परिवार आहे. भास्कर पोपट पाटील यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button