खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहरात मोटारसायकली चोरट्यांचा धुमाकुळ दोन भागातून झाल्या चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून मोटारसायकली चोरीच्या घटनेत वाढ झाली असून आणखी वेगवेगळ्या भागातून दोन मोटरसायकल चोरी झाल्यात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिंधी कॉलनीतील रहिवाशी गोवर्धनदास लालचंद डावराणी यांची ४५ हजार रूपये किमतीची मोटारसयाकल ( एमएच 19 सी बी 9440) ही अंगणात लावलेली असतांना अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना दि 30 ते 31 मे दरम्यान घडली. अमळनेर पोलिसांत भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पुरुषोत्तम पाटील करीत आहेत. तर योगेश सुधाकर महाजन यांची ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल ( एमएच 19 बी एन 3718) वाघ बिल्डिंग बालाजीपुरा येथे ३० मे रोजी दुपारी राहत्या घरी झाडाच्या सावलीत लावली असता ती चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत अमळनेर पोलिसांत भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button