खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पाडळसरे धरणाने बाधित सात्री ग्रामस्थ भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, महेंद्र बोरसेंनी केले लढवय्य नेतृत्व

आमदार अनिल पाटील यांनीही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन केल्या सूचना

पाडळसरे धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता उघड झाल्याने प्रचंड नाराजी

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरणाच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या सात्री ग्रामस्थांच्या मरण यातणा कमी होण्यासाठी पुनर्वसन गावठाणातील भूखंड वाटप, पुनर्वसन व पुर्नस्थापनेच्या कामाला गती देणे, पर्यायी रस्ता व व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात धडक मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व महेंद्र बोरसे, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केले. तर याच विषयासंर्भात आमदार आनिल पाटील यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने मागण्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तसेच या पाडळसरे धरण समितीचा एकही पदाधिकारी सहभागी न झाल्याने त्यांची निष्क्रियता दिसून आली. आणि त्यांना चमकोगिरीसाठी केवळ धरण दिसते पण मरण दिसत नाही, अशा भावनाही यातून स्पष्ट झाल्या.
पाडळसरे धरणाच्या बॅक वाटरमुळे अमळनेर तालुक्यातल सात्री ग्रामस्थांना प्रशासनाच्या निर्लज्य धोरणामुळे धड जगताही येत नाही आणि धड मरताही येत नाही. अनेक वर्षापासून पुर्नवसासाठी चाललेली धडपड आणि पावसाळ्यात भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना दूर करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसे ह्या प्रकल्पात १०० % पूर्णतः बुडीताखाली येत असल्याने पुनवर्सन करण्यात येत आहे. त्याकरीता परिशिष्ट ‘ अ ‘ निश्चित नसतांना २००० साली स्लॅब रजिस्टर तयार करण्यात आले आहे. त्यात अनेक कुटुंबांची नोंदणी करण्यात आलेली नाही तर काही कुटुंबांची माहिती अपूर्ण घेतलेली आहे. याबाबत महेंद्र बोरसे यांनी जून २०१३  जिल्हाधिकारी यांना लक्षात आणून दिले त्यानुसार त्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात २९ ऑगस्ट २०१३ रोजी बैठक घेऊन संबंधित कागदपत्रांची पाहणी करुन चर्चा केली व सदर स्लॅब रजिस्टर नव्याने करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत . परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने तत्कालीन आमदार  कृषिभूषण साहेबराव पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत भेट घेऊन ह्या विषयावर चर्चा केली असता त्यांना दि. १० जून २०१४ रोजी उपमुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक घेण्यात आली . यात चर्चा करुन विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करावा असे ठरले. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्ताव शासन स्तरावर न्यायप्रविष्ठ ( विचाराधीन ) आहे असे असतांना देखील २२ वर्षांपूर्वी सन २००० साली झालेल्या चुकीच्या सर्वेक्षणानुसार व तत्कालीन कुटुंब संख्या ग्राह्य धरुन जिल्हा पुनवर्सन अधिकारी यांनी पुनर्वसन गावठाणातील भूखंड वाटप करण्याबाबत दिनांक ३०/०५/२०२२ रोजी सभा आयोजित केली आहे. सदर प्लॉट वाटप प्रक्रिया बेकायदेशिर व लाभार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. मदत पुनर्वसन मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असतांना बेकायदेशिर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने ही सभा रद्द करुन नव्याने कुटुंब सर्वेक्षण करुन वाढीव कुटुंब तसेच वाढीव घरांचा निर्णय करुनच भुखंड वाटप करण्यात यावे. त्याचप्रमाणे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कामाला गती देण्यात यावी. गृहसंपादनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सन २०१८ पासून दाखल असून सदर प्रस्तावाची संयुक्त मोजणी प्रक्रिया होऊन २ वर्षे झाले तरी देखील पुढील प्रक्रियेस चालना मिळालेली नाही. तसेच भुमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई व पारदर्शकतेचा हक्क, प्रकल्पासाठी जमिनीचे भुसंपादन करण्यापूर्वी बाधित क्षेत्रातील कुटुंबांचे सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणे गरजेचे असतांना त्याकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप मोर्चेकरी सुनिता सुनिल बोरसे, महेंद्र शालिग्राम बोरसे, निर्मलाबाई बोरसे, वर्षा बोरसे, शिवांगी बोरसे, मिराबाई भिल, रविंद्र बोरसे, पोइरंरा भिका भिक, रोहिदास बाविस्कर, पांडुरंग भिल यांच्यासह ग्रामस्थांनी केला.

जाहिरात

शासन आणखी किती आरूषींचा बळी घेणार

दरम्यान अतिशय संवेदनशील व लक्षणीय मुद्दा असा आहे की , आजपर्यंत सात्री गावाला जायला बोरी नदीतून जावे लागते. पुल नसल्याने व अन्य कोणाताही पर्यायी मार्ग जाण्यासाठी नसल्याने पावसाळयात गावाचा संपर्क तुटतो आणि शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते. एकीकडे गावाचे पुनर्वसन होत नाही दुसरीकडे गावाला जायला पुल नाही, पर्यायी रस्ताही नाही. दिनांक ०७ / ० ९ / २०२१ रोजी बोरी नदीला आलेल्या पुरामुळे आरुषी नावाच्या ११ वर्षीय आदिवासी मुलीवर उपचार करता आले नाही म्हणून तिचा दुर्दैवी अंत झाला होता. शासन आणखी किती आरुषींचा बळी घेणार ? किती मुलांचे शैक्षणिक, किती शेतकऱ्यांचेव नागरिकांचे नुकसान करणार आहे. पर्यायी मार्ग तातडीने करावा किंवा पुल बांधावा अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे.

प्रशासनाने सात्री ग्रामस्थांचा आक्रोश समजून घ्यावा ः प्रतिभाताई शिंदे

भर उन्हात सात्री गावातून ट्रकने प्रवास करीत जळगाव येऊन मोर्चा काढला. त्यामुळे ग्रामस्थांचा या आंदोलनचा आक्रोश समजून घेत चुकीच्या भूखंड वाटपाचा ३० रोजीचा कार्यक्रम रद्द करून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या वेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना केली.

आमदार अनिल पाटील यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने पत्र

सात्री ग्रामस्थांनी सकाळी आमदार अनिल पाटील यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर तातडीने आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिन ३० रोजीचा भूखंड वाटपाचा कार्यक्रम रद्द करून पर्यायी पर्यायी रस्ता व व्यवस्था उपलब्ध  आणि पुर्नवसन संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून केल्या.

३० रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक

अप्पर जिल्हाधिकारी यांनी  सात्री ग्रामस्थांचे निवेदन स्विकारले. भूखंड वाटपाचे नियोजन स्थगित केले. तसेच यांसदर्भात ३० तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत पुनर्वसन आणि सात्री ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. प्रशासनाने तातडीने आंदोलकांची दखल घेऊन बैठक आयोजित केल्याने प्रतिभा शिंदे आणि मेहंद्र बोरसे आणि आमदार अनिल पाटील यांच्या पत्राचे वजन पाहता, आंदोलकांसाठी ही मोठी उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे.

पाडळसरे धरणासाठी प्रतिभाताई शिंदे आणि महेंद्र बोरसेंच्या रुपाने नव्या नेतृत्वाचा उदय

दरम्यान, पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अत्यंत निष्क्रीय झाल्याने केवळ फोटोसेशनपुरतेच त्याचे काम मर्यादीत राहिल्याने नागरिकांमध्ये या समितीविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ही समितीच बरखास्त करून नवीन चळवळ आणि नवे नेतृत्व उदयास यावे, असा आशयाचे वृत्त खबरीलालने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे शुक्रवारी सात्री ग्रामस्थांचे नेतृत्व करीत   लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाई शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यांना महेंद्र बोरसे यांनी साथ मिळाली आहे. तर आमदार अनिल पाटील यांनाही या आंदोलनातून धरण आणि पुर्नवसनासाठी शासनदरबारी प्रश्न मांडण्याचे बळ मिळाले आहे. तर या आंदोलनातूनच प्रतिभाताई शिंदे आणि महेंद्र बोरसे हे पाडळसरे धरणसाठी नवे नेतृत्व उदयास आले आहे. तर यातून पाडळसरे धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button